December 02, 2019

आठवणींतल प्रेम

परतीचा वारा जरा जास्तच घुमलाय
तुझ्यात अन् माझ्यात तो ही रमलाय
आठवणींतींल घर तुझ्या आता मला ही आठवतंय
माझ्या स्वप्नातील गाध्यांवर तुझं हि मन लोळतंय ।।१।।

ओळखीचं नात तुझं मी ही जपतोय
प्रेमाचा खुराक त्याला मी ही देतोय
आठवणींचे ढोस तसे मी ही पाजलेत
ओळखीचे ही आता अनोळखी झालेत ।।२।।

ओळखीचाही आता आनोळखी झालाय
राहडगाडग्यातील आठवणी तो ही विसरलाय
त्या रात्रीची गोष्ट प्रेमाची तसा तो ही जगलाय
अंधारातील प्रेमाच्या तुझ्या सावलीत तो ही हरवलाय।।३।।

नात्यांतील गोडवा तुझ्या मी ही चोखलाय
आठवणीत तुझ्या आता तो ही हरवलाय
प्रेमाच्या आठवणीत तुझ्या तसा तो ही जगलाय
मात्र तुझ्या आठवणींचा माठ आता रिकामा झालाय ।।४।।



                                                              -TheExWriter✍🏻

No comments:

Post a Comment